महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

केरळमधील गर्भवती हत्तीणीची हत्या; कठोर कारवाईसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा पुढाकार - श्रद्धा कपूर अपडेट न्यूज

केरळमध्ये अज्ञात लोकांनी एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये फटाके भरुन खायला देत तिची हत्या केली. या घटनेमुळे उद्विग्न झालेल्या लोकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर सर्वात पुढे होती. श्रद्धाने या क्रूरतेच्या विरोधात कठोर कायादा लागू करण्याबाबतच्या याचिकेवर सह्या करण्याचे आवाहन केले.

kapoor
अभिनेत्री श्रद्धा कपूर

By

Published : Jun 4, 2020, 1:46 AM IST

Updated : Jun 4, 2020, 5:53 AM IST

मुंबई- केरळमध्ये अज्ञात लोकांनी एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये फटाके भरुन खायला देत तिची हत्या केली. या घटनेमुळे उद्विग्न झालेल्या लोकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर सर्वात पुढे होती. प्राण्यांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांसोबत आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्रद्धाने आपल्या सोशल मीडियावरुन या मुद्द्याला हात घातला. सोशल मीडियावरील आपली व्यापकता आणि प्रभावाचा वापर करत, श्रद्धाने या क्रूरतेच्या विरोधात कठोर कायदा लागू करण्याबाबतच्या याचिकेवर सह्या करण्याचे आवाहन केले.

अभिनेत्री श्रद्धा कपूर

याविषयी श्रद्धाने लिहिले की,“आपल्याला पशू क्रूरतेच्या विरुद्ध कठोर कायद्यांची आवश्यकता आहे. या घटनेनंतर तर हे खूप अत्यावश्यक झाले आहे. कृपया या याचिकेवर सही करा.”प्राणिसंग्रहालयांवर प्रतिबंध लावण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यापासून ते रस्त्यांवरील भटक्या जानवरांच्या मदतीपर्यंत, श्रद्धा कपूर 'पशू कल्याण आणि अधिकार' यांची अग्रदूत बनली आहे.

अभिनेत्री श्रद्धाने नुकत्याच एका अंतरराष्ट्रीय प्राणी अधिकार संघटनेसोबत मिळून प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसोबत होणाऱ्या कठोर व्यवहारांना अधोरेखित केले होते. श्रद्धाने आपल्या इंस्टाग्रामवर देखील या घटनेबाबत विस्ताराने लिहिले आहे, "एका गर्भवती हत्तीणीला केरळमध्ये काही अज्ञात लोकांद्वारे फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला, तिच्या तोंडात झालेल्या स्फोटामध्ये तिच्या जबड्याला जबर इजा झाली. वेदनेने व्याकुळ होऊन ती हत्तीण संपूर्ण गावभर भटकत राहिली आणि शेवटी एका नदीत तिने आपले प्राण सोडले. आपण राक्षसांच्या डोक्यावर शिंग असतात असे वाटून त्यांचा सगळीकडे शोध घेत राहतो. मात्र, हे बिनशिंगांचे राक्षस आपल्यातच आहेत.

भटक्या कुत्र्यांवर दगड मारणाऱ्यांपासून जीवित आत्म्याला वेदना देण्यापर्यंत, कोणत्याही व्यक्तिला निवडा. यातील बहुतेक प्राणी माणसांवर विश्वास ठेवतात, ही क्रूरता मोजू शकत नाही, एवढी भयानक आहे. जेव्हा आपल्याकडे सहानुभूती आणि दयेची कमतरता असते, तेव्हा तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे रहात नाहीत. कोणालाही जखमी करणे हे मानवीय नाही. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. जोपर्यंत दोषींना सर्वात वाईट पद्धतीने शिक्षा होणार नाही, तोपर्यंत हे दुष्ट राक्षस कायद्याला देखील घाबरणार नाहीत असे तिने यामध्ये नमूद केले आहे.

Last Updated : Jun 4, 2020, 5:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details