महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री प्राची देसाईचे तिसऱ्या पडद्यावरून 'कमबॅक'! - प्राची देसाईचे तिसऱ्या पडद्यावरून कमबॅक

'सायलेन्स कॅन यु हियर ईट' या वेब सीरिज मधून प्राची ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ही एक मर्डर मिस्ट्री सिरीज असून अर्जुन माथूर, सहील वैद्य आणि मनोज वाजयेपी यात प्राची सोबत असणार आहेत. आबान भरूचा देवहंस हे झी स्टुडीओद्वारा निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत.

प्राची देसाई
प्राची देसाई

By

Published : Feb 21, 2021, 9:41 AM IST

मुंबई - काही वर्षांपूर्वी प्राची देसाई टेलिव्हिजनवरील उच्चस्थानी असलेली अभिनेत्री होती. त्यानंतर तिने चित्रपटांतून हिरॉईन म्हणून नाव कमावले. परंतु काही वर्ष ती मनोरंजनसृष्टीपासून लांब होती. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई आता तिसऱ्या पडद्यावरून कमबॅक करते आहे. तिसरा पडदा म्हणजे वेब सीरिज. चित्रपटसृष्टीतील अनेक बडी नावे ह्या तिसऱ्या पडद्याशी जवळीक साधून आहेत. येथे स्टार म्हणजे कथानक असते. प्राची देसाईनेसुद्धा आशयघन कथानक निवडत आपले कमबॅक सार्थ करण्याचे ठरविले आहे.

प्राची देसाई

'सायलेन्स कॅन यु हियर ईट' या वेब सीरिज मधून प्राची ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ही एक मर्डर मिस्ट्री सिरीज असून अर्जुन माथूर, सहील वैद्य आणि मनोज वाजयेपी यात प्राची सोबत असणार आहेत. आबान भरूचा देवहंस हे झी स्टुडीओद्वारा निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या सीरिजमध्ये एक महिला अचानक रहस्यमयरित्या गायब झाली आहे. ती घरातून बाहेर जात असताना एक दुःखद घटना घडते आणि ती गायब होते. दुसऱ्या दिवशी तिचे शव गिर्यारोहकांना डोंगरावर सापडते.

प्राची देसाई

प्राची देसाई म्हणाली की, ''मी अशा प्रकारची भूमिका प्रथमतःच करीत आहे. प्रेक्षकांना मला अशा वेगळ्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल. तसेच इतक्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करताना मला खूपच आवडले, कारण मला बरेच शिकायला मिळाले. 'सायलेन्स कॅन यु हियर ईट' अतिशय वेगळ्या धाटणीची कथा असून त्यामुळेच मी ती करायची ठरवले.''

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : राजीव रामला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

ABOUT THE AUTHOR

...view details