महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Relief to Jacqueline Nora Fatehi : जॅकलिन आणि नोरा फतेही यांना दिलासा, मोक्का अंतर्गत होणार नाही कारवाई - मनी लाँड्रिंगची चौकशी

सुकेश चंद्रशेखर ( sukesh chnadrashekhar ) यांच्या 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही ( Jacqueline Fernandez and Nora Fatehi ) यांना दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. दिल्ली पोलीस या दोघींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार नाहीत. दिल्ली पोलिसांना कायदेतज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, दोन्ही अभिनेत्रींवर मकोकाचा ( action under macoca ) गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे, मनी लाँड्रिंगची चौकशी करणारी ईडी भविष्यात त्यांच्यावर कारवाई करू शकते.

जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही
जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही

By

Published : Jan 22, 2022, 4:17 PM IST

नवी दिल्ली - सुकेश चंद्रशेखर ( sukesh chnadrashekhar ) यांच्या 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही ( Jacqueline Fernandez and Nora Fatehi ) यांना दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. दिल्ली पोलीस या दोघींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार नाहीत. दिल्ली पोलिसांना कायदेतज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, दोन्ही अभिनेत्रींवर मकोकाचा ( action under macoca ) गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे, मनी लाँड्रिंगची चौकशी ( Sukesh Chandrasekhar Money Laundering Case ) करणारी ईडी भविष्यात त्यांच्यावर कारवाई करू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुकेशसह डझनहून अधिक जणांना अटक केली आहे. यामध्ये सात तुरुंग अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुकेशविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोक्कामध्ये 11 जणांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान सुकेश चंद्रशेखरने फसवणूक झालेल्या पैशांचा मोठा हिस्सा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर खर्च केल्याचे उघड झाले. त्यांनी त्यांना मौल्यवान भेटवस्तू तर दिल्याच शिवाय त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले. त्यानंतर पोलिसांना दोन्ही अभिनेत्रींना आरोपी बनवायचे होते.

दोन्ही अभिनेत्रींना आरोपी बनवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. या प्रकरणी दोन्ही अभिनेत्रींवर मोक्का अंतर्गत कारवाई करता येणार नाही, असे कायदेतज्ज्ञांच्या वतीने दिल्ली पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणात, आरोपीने खुलासा केला आहे की त्याने दोन्ही अभिनेत्रींना कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या.

पण या दोन्ही अभिनेत्रींना या पैशांचा स्रोत माहीत होता हे सिद्ध झालेले नाही. त्यांनी भेटवस्तू घेतल्या असतील पण फसवणुकीच्या रकमेतून ते आपल्याला दिले जात असल्याचे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करता येणार नाही.

रोहिणी तुरुंगात बसून सुकेश चंद्रशेखरने फोर्टिसचे माजी प्रवर्तक शिवेंद्र सिंह यांची पत्नी अदिती सिंह हिची २०० कोटींची फसवणूक केली होती. शिवेंद्रसिंह यांना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या नावाखाली त्यांनी आदिती सिंह यांच्याकडून ही रक्कम फसवली होती. या प्रकरणात त्याने तुरुंगात बसून कोट्यवधी रुपयांची फसवणूक सहज करता यावी, यासाठी कारागृह अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाचही दिली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून सुकेश चंद्रशेखर, त्यांची पत्नी लीना मारिया पॉल, तुरुंग अधिकारी, बँक अधिकारी यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

हेही वाचा -ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले होते 500 कोटी बजेटच्या चित्रपटाचे वचन

ABOUT THE AUTHOR

...view details