मुंबई - दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार आहे. तिचा बॉलिवूड डेब्यू दुसर्या कोणाबरोबर होणार नाही तर सुपरस्टार शाहरुख खानसोबत होणार आहे. तमिळ दिग्दर्शक अतली हेदेखील शाहरुखसोबतच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाबाबत अद्याप उधिकृत निवेदन आलेले नाही.
अभिनेत्री नयनतारा यांनी नुकताच या चित्रपटाबाबत स्वाक्षरी केली असल्याचे समजते. या प्रोजेक्टमध्ये शाहरुखशिवाय कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, हा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.
2019 मध्ये अतलीने आपला बिजिल हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी या चित्रपटाबद्दलचे संकेत दिले होते. त्याने ट्विटर चॅटद्वारे शाहरुख खानबरोबर काम करणार असल्याचे सांगितले होते.
अतलीला एका चाहत्याने शाहरुखसोबत काम करण्याबद्दल एक प्रश्न विचारला होता. यावर दिग्दर्शकाने म्हटले होते- ''मला शाहरुख सरांचा खूप प्रेम आणि आदर आहे. त्यांना माझं कामही आवडतं. आम्ही लवकरच काहीतरी करू अशी आशा आहे.''
तेव्हापासून अतली आणि शाहरुख एकत्र काम करणार असल्याबाबतची बातमी येत होती. असे म्हटले जात होते की अतली शाहरुखला 'मर्सेल' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये घेईल. शाहरुखच्या वाढदिवशी या प्रकल्पाची घोषणा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
अतलीबरोबर शाहरुख खानचा हा पहिला चित्रपट असेल, तर नयनताराचा हा तिसरा चित्रपट आहे. नयनताराला अखेर तामिळ कॉमेडी 'मुकुथी अम्मन' मध्ये पाहिले होते ज्यात तिने एका देवीची भूमिका साकारली होती. तमिळ थ्रिलर 'नेत्रिकान' हा त्याचे आगामी चित्रपट आहेत. हा चित्रपट कोरियन थ्रिलर 'ब्लाइंड'चा रिमेक आहे.
हेही वाचा - स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत 'खाशाबा' साकारणाऱ्या उज्ज्वलचा अवघ्या २९ व्या वर्षी मृत्यू