महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Actress Hruta Durgule : हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली - अनन्या

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Actress Hruta Durgule) ही अभिनेत्री 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली ती सतत सोशल मीडियावर एक्टिव असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Actress Hruta Durgule
हृता दुर्गुळे

By

Published : Nov 19, 2021, 12:11 PM IST

Updated : Nov 19, 2021, 1:40 PM IST

मुंबई - अभिनेत्री हृता दुर्गुळे (Actress Hruta Durgule) ही अभिनेत्री 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली ती सतत सोशल मीडियावर एक्टिव असते. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री हृता सध्या टीव्ही दिग्दर्शक प्रतिक शाहला (TV director Pratik Shah) (Hruta Durgule lover) डेट करत असून तिने आपले नाते व्यक्त केले असून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये ते एकमेकांकडे बघत आहे.

'मन उडु उडु झालं'मध्ये करतेय दीपिकाची भूमिका -

झी मराठीवरील 'मन उडु उडु झालं' या मालिकेतही ती दीपिका देशपांडेची भूमिका साकारताना दिसत आहे.

फुलपाखरूतून पोहोचली घराघरात -

हृता हिने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुर्वा या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०१७ साली हृताने फुलपाखरू मालिकेतून आपली ओळख निर्माण केली. आणि ती घराघरात पोहोचली होती. याच मालिकेतून ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोकात आली होती.
'अनन्या' आहे प्रलंबित -

हृता हिने अनन्या या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रवी जाधवद्वारे निर्मित 'अनन्या' हा कोविड-19 महामारीमुळे प्रलंबित आहे. अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही.

टाईमपास 3 साठी ही कास्ट -

2021 मध्ये, हृता मराठी चित्रपट टाईमपास 3मध्ये कास्ट झाली आहे.

हेही वाचा -Sooryavanshi on its way to a double century: 'सुर्यवंशी'ची द्विशतकाकडे वाटचाल, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस 163 कोटींची कमाई

हेही वाचा -Preity Zinta : ४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज

Last Updated : Nov 19, 2021, 1:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details