महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला पाकिस्तानातून धमक्यांचे फोन? - actress disha patani news

तेलुगू एंटरटेनमेंट पोर्टल ‘टॉलिवूड नेट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टप्रमाणे दिशाला फोन कॉल्सद्वारे धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानातील एका नंबरवरून तिला या धमक्या मिळत आहेत. दिशाच्या जवळच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

actress disha patani threatened allegedly from pakistan
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला पाकिस्तानातून धमक्यांचे फोन?

By

Published : Jan 22, 2021, 4:30 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड ढवळाढवळ करत असते असे वारंवार वाचायला मिळते. बऱ्याच सेलेब्रिटिजना त्यांच्याकडून धमक्या आल्याचे आपल्याला दबक्या आवाजात का होईना, ऐकायला मिळत असते. काही सुत्रांच्या माहितीनुसार, ‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र या धमक्या का मिळत आहेत, कोण देत आहे, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दिशाला पाकिस्तानातून धमक्या मिळत असल्याचे वृत्त आहे. मात्र, दिशा व तिच्या निकटवर्तीयांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

तेलुगू एंटरटेनमेंट पोर्टल ‘टॉलिवूड नेट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टप्रमाणे दिशाला फोन कॉल्सद्वारे धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानातील एका नंबरवरून तिला या धमक्या मिळत आहेत. दिशाच्या जवळच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. वृत्तानुसार, केवळ दिशालाच नाही तर पोलिसांनाही असे कॉल्स येत आहेत. ‘अकाऊंट करो जल्दी, जल्दी, तेरा लडकी (दिशा पटानी) नहीं बचेगा’, अशी धमकी कॉलवरुन मिळत आहे. धमक्या मिळत असलेले नंबर पाकिस्तानचे आहेत. मात्र दिशाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा - कृणालसोबतचे भांडण आले अंगउलट, दीपक हुड्डावर मोठी कारवाई

गेल्या वर्षी दिशा पटानी ‘मलंग’ चित्रपटात दिसली होती आणि हा चित्रपट हिट घोषित झाला होता. दिशाच्या गुणवत्तेला अधिक वाव देण्यासाठी सलमान ने तिला ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये प्रमुख नायिका म्हणून घेतले आहे. हा चित्रपट या वर्षी ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच, दिशा लवकरच ‘एक विलेन २‘ मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मलंगचा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details