अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेतून वाहिली राजीव कपूर यांना श्रद्धांजली! - अश्विनी भावे अमेरिकेत वास्तव्यास
अश्विनी भावे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनी आरके फिल्मस्च्या हीना चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. ‘हिना’च्या वेळी राजीव कपूर एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होते. काल राजीव कपूर गेल्याची बातमी ऐकल्यावर अश्विनी यांना धक्काच बसला. त्यांनी एका व्हिडीओमार्फत ‘चिंपू’ कपूर ला श्रद्धांजली वाहिली आहे.
राजीव कपूर यांना श्रद्धांजली
अश्विनी भावे हे हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील मराठी हिरॉईनस् पैकी एक मोठे नाव. धडाकेबाज, अशी ही बनवा बनवी, कळत नकळत सारख्या अनेक मराठी चित्रपटांतून तिने लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन, विक्रम गोखले अशा दिग्गज नटांबरोबर काम केलं. त्यानंतर तिची चक्क ऋषी कपूरची हिरॉईन म्हणून शोमन राज कपूर यांनी आर के बॅनरच्या ‘हिना’ मध्ये निवड केली. त्यानंतर अश्विनी भावे यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि हिंदी चित्रपटांत यशस्वी नायिकेचे स्थान मिळविले.