महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘वॉटर बेबी’ अनन्या पांडे डुंबतेय ‘मालदीव’ च्या समुद्रात! - Latest Bollywood News

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद आहेत. फक्त दुबई, थोड्या-फार प्रमाणात लंडन आणि मालदीव बेटे. फक्त दुबई व मालदीवला विलगीकरणाची सक्ती नाहीये व गेल्या काही महिन्यांत जवळपास अर्ध बॉलिवूड मालदीवला भेट देऊन आलंय. सामान्य माणूस सुट्टीनिमित्त खंडाळा-लोणावळ्याला जातो, तसे फिल्मस्टार्स मालदीवला भेट देताहेत.

‘वॉटर बेबी’ अनन्या पांडे न्यूज
‘वॉटर बेबी’ अनन्या पांडे न्यूज

By

Published : Jan 31, 2021, 5:30 PM IST

Updated : Jan 31, 2021, 6:33 PM IST

मुंबई -गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री अनन्या पांडे ‘बॅक-टू-बॅक’ प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होती. दीपिका पदुकोन आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ती दिग्दर्शक शकुन बात्राच्या आगामी चित्रपटात काम करतेय. दीपिकाच्या खासगी आयुष्यातील अस्वस्थतेमुळे गोव्यात सुरू असलेले या चित्रपटाचे शूट थांबवावे लागले. त्यानंतर काही महिन्यांनी गोवासदृश वाटणाऱ्या अलिबागमध्ये चित्रीकरण करण्याचा मार्ग निवडण्यात आला व दीपिका, सिद्धांत व अनन्या मुंबईहून रोज समुद्रमार्गे अलिबागला अप-डाउन करू लागले. नुकतेच या चित्रपटाचे अनन्याच्या भागाचे शूट संपले व रोजच्या धकाधकीतून विरंगुळा मिळविण्यासाठी अनन्याने गाठले ‘मालदीव’.

‘वॉटर बेबी’ अनन्या पांडे डुंबतेय ‘मालदीव’ च्या समुद्रात!

हेही वाचा -नोरा फतेहीचा 2020 वर्षातला शेवटचा जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहिलात का?


आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद आहेत. फक्त दुबई, थोड्या-फार प्रमाणात लंडन आणि मालदीव बेटे. फक्त दुबई व मालदीवला विलगीकरणाची सक्ती नाहीये व गेल्या काही महिन्यांत जवळपास अर्ध बॉलिवूड मालदीवला भेट देऊन आलंय. सामान्य माणूस सुट्टीनिमित्त खंडाळा-लोणावळ्याला जातो, तसे फिल्मस्टार्स मालदीवला भेट देताहेत.

अनन्याला समुद्र खूप आवडतो म्हणून तिने मालदीवला छोटी सुट्टी घालवली. ती स्वतःला ‘वॉटर बेबी’ समजते व तिला पाण्यात डुंबायला फार आवडते. अनन्या पांडेने शूटिंग आणि इतर कामांची वचनबद्धता पूर्ण केल्यावर ताजेतवाने होण्यासाठी व क्षणिक विश्रांतीसाठी मालदीवची सहल केली. या सुस्वरूप अभिनेत्रीने एक व्हिडिओ काढला ज्यामध्ये दिसते की, तिने नयनरम्य जागेचा, वातावरणाचा आणि समुद्राचा आनंद कसा घेतला. गुलाबी ‘स्विम-वेयर’मध्ये ती ‘इन्फिनिटी पूल’ मध्येही पोहण्याचा आनंद लुटताना दिसतेय. याआधीही अनन्या नवीन वर्षाचे स्वागत करायला, ईशान खट्टरसोबत, मालदीवला गेली होती. अनन्याने गमतीत समाज माध्यमावर लिहिले की ‘आईशप्पथ, हा ‘मालदीव’ मधील शेवटचा फोटो’.

सर्वात तरुण पॅन-इंडिया स्टार असलेल्या अनन्या पांडे विजय देवेराकोंडा समवेत ॲक्शन एंटरटेन्टर ‘लायगर’ मध्ये दिसणार आहे. तसेच आधीच नमूद केल्याप्रमाणे दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासमवेत शकुन बात्राच्या आगामी, अजून नाव न ठरलेल्या, चित्रपटातून ती प्रेक्षकांना सामोरी जाणार आहे.

हेही वाचा -अनन्या पांडेचा हॉट अंदाज पाहिलात का?

Last Updated : Jan 31, 2021, 6:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details