मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे चित्रपटाचं प्रदर्शन ११ एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच निवडणूक आयोगाने या चित्रपटाला स्थगिती दिल्याची बातमी समोर आली.
'मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला विघ्न, विवेक पोहोचला सिद्धीविनायक मंदिरात - pm modi
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे म्हणत निवडणूक आयोगाने चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित केले. याच चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विवेक ओबेरॉयने आता सिद्धीविनायक मंदिरात येऊन दर्शन घेतले.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे म्हणत निवडणूक आयोगाने चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित केले. याच चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विवेक ओबेरॉयने आता सिद्धेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये प्रचंड विघ्न येत असल्याने हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी मागणी आपण देवाकडे केली असल्याचे विवेकने म्हटले आहे. या चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे त्यामुळे विघ्नहर्ता या चित्रपटाच्या मार्गातील विघ्न नक्कीच दूर करेल, असा विश्वासही विवेकने व्यक्त केला आहे.