मुंबई - हरहुन्नरी, अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष 'ग्लायोब्लास्टोमा'(ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी अमेरिकेतील लॉस अँजेलिसमधील हॉस्पिटलमध्ये त्याचे ब्रेन कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० मे रोजी सकाळी ७:३० वाजता त्याची प्राणज्योत मावळली.
'पीके' सिनेमातील 'या' अभिनेत्याचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास
हरहुन्नरी, अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष 'ग्लायोब्लास्टोमा'(ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० मे रोजी सकाळी ७:३० वाजता त्याची प्राणज्योत मावळली. साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या Splitsvilla, Season 4, स्टार प्लसवरील Survivor या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या Splitsvilla, Season 4, स्टार प्लसवरील Survivor तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,The Card मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदीमध्ये त्यांनी 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्येही विविध भूमिका केल्या आहेत.
डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. फॅशन डिझायनर सपना अमीन यांच्यासोबत २०१५ रोजी साई यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.