मध्यप्रदेश -'चिडियाघर' या टीव्ही मालिकेत बापुजीची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र गुप्ता यांनी खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लागली. आज सोमवारी महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ते खजुराहो येथे पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात भाग घेत कार्यक्रमाचे कौतुक केले.
अभिनेता राजेंद्र गुप्ता यांची प्रतिक्रिया... हेही वाचा.... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'
राजेंद्र गुप्ता यांच्या सोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. यावेळी बोलताना गुप्ता म्हणाले की, मध्यप्रदेशमधील बुंदेलखंडच्या छोट्याशा भागात इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला जात आहे, ही फार आनंदाची बाब आहे. यामाध्यमातून येथील कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा.... सीएए कायद्यातील तरतुदींवर राहुल गांधींनी केवळ 10 ओळी बोलून दाखवाव्यात, भाजपचे आव्हान
राजा बुंदेला यांच्या कामाचे कौतुक करताना राजेंद्र गुप्ता म्हणाले की, राजा बुंदेला यांनी केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. बुंदेला हे येथील कलाकारांसाठी मैलाचा दगड असल्याचे सिद्ध होत आहेत. तसेच कमीतकमी स्त्रोतांमध्ये त्यांनी चांगले काम केले, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक
राजेंद्र गुप्ता यांनी पुढे बोलताना सांगितले की, येथील लोकांमध्ये कलेची कमतरता नाही. मात्र, ही कला योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे आणि राजा बुंदेला ते काम चांगल्या प्रकारे करत आहेत. कलेला योग्य व्यासपीठ देत आहे.