महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेता कमल हसनने घेतली कोरोना लस; बुधवारपासून सुरू करणार निवडणूक प्रचार - Actor-politician Kamal Haasan corona vaccine

'मक्कल नीधी मैयम' या कमल हसनच्या पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कमल हसन सहभाग घेणार आहे. चेन्नईमधून ते या निवडणुकीला उभा राहतील. बुधवारपासून ते आपल्या प्रचाराला सुरुवात करतील.

Actor-politician Kamal Hassan receives Covid-19 vaccine shot
अभिनेता कमल हसनने घेतली कोरोना लस; बुधवारपासून सुरू करणार निवडणूक प्रचार

By

Published : Mar 2, 2021, 5:19 PM IST

चेन्नई :कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. लसीकरण केंद्रांवर ४५ ते ५९ वयोगटांतील व्याधीग्रस्त व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यामध्येच अभिनेते कमल हसन यांनीही ही लस घेतली आहे. आज (मंगळवार) चेन्नईमध्ये त्यांनी या लसीचा पहिला डोस घेतला.

'मक्कल नीधी मैयम' या कमल हसनच्या पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कमल हसन सहभाग घेणार आहे. चेन्नईमधून ते या निवडणुकीला उभा राहतील. बुधवारपासून ते आपल्या प्रचाराला सुरुवात करतील.

अभिनेता कमल हसनने घेतली कोरोना लस; बुधवारपासून सुरू करणार निवडणूक प्रचार

कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अशा अनेक मोठ्या नेत्यांनीही पहिला डोस घेतला आहे.

हेही वाचा :CORONA Vaccination : नरेंद्र मोदी, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली लस

ABOUT THE AUTHOR

...view details