मुंबई - सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिक्स, रिमेक्स आणि सिक्वेल्सची चलती चालू आहे. २०१४ साली मोहित सूरी दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख अभिनित ‘एक व्हिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि हिट ठरला होता. हल्लीच्या चित्रपटसृष्टीच्या ‘कायद्यानुसार’ त्याचा रिमेक बनणे अनिवार्य होते. हल्लीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला व ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनी नुकतीच चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली.
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर जितेंद्र तसं बघायला गेलं तर हा जितेंद्रच्या घरचाच चित्रपट आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याची निर्मिती त्यांची मुलगी एकता कपूर आणि पत्नी शोभा कपूर करीत आहेत. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे जो मोहित सूरी दिग्दर्शित करीत आहे आणि बालाजी मोशन पिक्चर्स आणि टी-सिरीज तर्फे संयुक्तपणे निर्मित होत आहे. या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी नसली तरी, हा सिनेमा मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाचा ‘आध्यात्मिक’ सिक्वेल आहे असे म्हटले जातेय.
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर जितेंद्र जितेंद्रजी जेव्हा ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर पोहोचले तेव्हा सर्व युनिटला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांच्या गोड व्यक्तिमत्वाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले. हा दिग्गज स्टार चित्रपटाच्या टीमबरोबर बॉन्डिंग करताना दिसला. त्यांनी टीममधील प्रत्येकाशी हितगुज केले व आशीर्वादही दिले. साहजिकच फोटो-ऑपचा कार्यक्रमही झाला. २०२२ मधील बहूप्रतिक्षीत आणि सर्वात मोठ्या अॅक्शन थ्रिलरपैकी एक असलेल्या मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर जितेंद्र एकता कपूर, भूषण कुमार, शोभा कपूर आणि किशन कुमार यांची निर्मिती असलेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा -
'अजीब दास्तां'चा टिझर : चार विचित्र कथांचा अनोखा कोलाज