महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेष्ठ अभिनेता जीतेंद्र आणि धर्मेंद्र यांची दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांना वाहिली श्रद्धांजली! - धर्मेंद्रने दिलीप कुमार यांना श्रध्दांजली वाहिली

दिलीप कुमार यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेला धर्मेंद्र अतिशय भावुक दिसला आणि म्हणाला की, ‘युसूफ माझ्या भावाप्रमाणे होता. त्याच्या निधनाच्या बातमीने मला शॉक बसला. आमच्यात विलक्षण वेगळे नाते होते आणि त्याच्या जाण्याने मला अत्यंत दुःख झाले आहे. त्याच्या आठवणी नेहमी माझ्यासोबत राहतील

pay-homage-to-veteran-actor-dilip-kumar
दिलीप कुमार यांना वाहिली श्रद्धांजली!

By

Published : Jul 8, 2021, 3:20 PM IST

दिलीप कुमार यांचे निधन झाल्यावर भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाल्यागत झाली. ज्याच्या अभिनयावर अभिनेत्यांच्या काही पिढय़ा पोसल्या गेल्या त्या दिलीप कुमारने प्राण सोडला तेव्हा त्याची पत्नी सायरा बानू आणि इतर कुटुंबीय त्यांच्या सोबत होते. मुंबईतील खार येथील हिंदुजा इस्पितळातून त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले आणि अनेक दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर जुहू कबरस्तान येथे त्यांना शाही इतमामात मूठमाती देण्यात आली.

दिलीप कुमार यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार सारखे दिग्गज नेते आले होते तसेच शाहरुख खान, विद्या बालन, शबाना आझमी, धर्मेंद्र, जितेंद्र सारखे अनेक कलाकार येऊन गेले. धर्मेंद्र तर अतिशय भावुक दिसला आणि म्हणाला की, ‘युसूफ माझ्या भावाप्रमाणे होता. त्याच्या निधनाच्या बातमीने मला शॉक बसला. आमच्यात विलक्षण वेगळे नाते होते आणि त्याच्या जाण्याने मला अत्यंत दुःख झाले आहे. त्याच्या आठवणी नेहमी माझ्यासोबत राहतील. दिलीप कुमारने जवळपास सहा दशकांच्या कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आणि भारतीय रुपेरी पडदा उजळून टाकला होता. मी त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे.’

धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेतले

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी हॉस्पिटलमध्ये दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेतले. ‘मला दिलीप साब सोबत काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझे दुर्दैव. पण त्यांचा माझ्या कामावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. गेल्या वर्षीच्या मोठ्या लॉकडाऊनमध्ये मी त्यांचे अनेक चित्रपट पुन्हा पाहिले आणि त्यांच्याबद्दलचा आदर बळावला. दिलीप साब हे अभिनयाचे एक विद्यापीठ होते. अनेक कलाकार म्हणतात की त्यांच्यासोबत नुसतं फ्रेममध्ये उभं राहिल्यावर अंगात वेगळेच स्फुरण चढत असे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना’, मधुर भांडारकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.

मधुर भांडारकर यांनी हॉस्पिटलमध्ये दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेतले

भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिलीप कुमार यांनी आज मुंबईत अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचे अंत्यदर्शन घेताना जेष्ठ अभिनेता जितेंद्र सुद्धा भावुक झालेला दिसला. त्याने दिलीप साब यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांच्याकडे शोक व्यक्त केला. जीतेंद्र म्हणाला की, ‘दिलीप कुमार यांच्याबद्दल मी काय बोलू? त्यांनी माझ्यासारख्या अनेक कलाकारांना योग्य अभिनय-दिशा दर्शविली. ते अनेकांचे प्रेरणास्थान होते आणि त्यावेळच्या बहुतेक प्रत्येक कलाकाराला ‘दिलीप कुमार’ बनावे असे वाटत असे. तो केवळ पडद्यावरील एक प्रतिभाशाली अभिनेता नव्हता तर एक उत्तम मित्र आणि लाखमोलाचा माणूस होता जो कोणाच्याही मदतीसाठी तत्पर होता. मी त्यांना विसरणे कदापि शक्य नाही, सायरा जी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मी आणि माझी फॅमिली सहभागी आहे.’

हेही वाचा - सिंटा अध्यक्ष विक्रम गोखले यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना वाहिली आदरांजली!

ABOUT THE AUTHOR

...view details