मुंबई -कोणत्याही व्यक्तीला आपला लुक चांगला असावा अशी इच्छा असते. आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी डोक्यावरचे केस फार महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र, काही लोकांना केस गळण्याची समस्या असते. तर, काहींच्या डोक्यावर केसच उगवत नाहीत. मग, केस उगवण्यासाठी ते काही ना काही आटापीटा करत असतात. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्याही डोक्यावरचे केस बऱ्याच वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे आता त्यांनी जगभरातील टक्कल असणाऱ्यांसाठी एक गाणं गायलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
टक्कल असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात काय समस्या येतात, हे काहीदिवसांपूर्वीच 'बाला' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटातून पडद्यावर दाखवण्यात आले आहे. मात्र, अनुपम खेर यांनी एका गाण्याच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -क्रितीच्या आयुष्यात खुललं प्रेम?, 'या' फोटोची होतेय चर्चा