नवी दिल्ली - महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ यांचा होणार गौरव - Amitabh Bachchan LATEST NEWS
बिग बी अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठीत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वानुमते त्यांची निवड दादासाहेब पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटरवर याची घोषणा केली आहे. दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दोन पिढ्या मनोरंजन करत प्रेरणा दिली. सर्वानुमते त्यांची निवड दादासाहेब पुरस्कारासाठी करण्यात आली असून संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायायामुळे आनंदित झाला आहे. माझ्या त्यांना ह्रदयपूर्वक शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट जावडेकरांनी केलंय.
बॉलिवूड आणि भारतीय सिनेक्षेत्रासह सर्वच थरातून बच्चन यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
Last Updated : Sep 25, 2019, 5:04 PM IST