महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बर्थडे स्पेशल; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केलेल्या अतरंगी गोष्टी!

चित्रपटांसाठी असलेले आमिर खानचे पॅशन सर्वांनाच ठाऊक आहे. तो एखादा चित्रपट करीत असताना त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘लालसिंग चढ्ढा’च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. त्यात बाधा पडू नये म्हणून त्याने चित्रपट प्रदर्शनापर्यंत मोबाईल वापराने सोडून दिले.

amir khan
अमिर खान

By

Published : Mar 14, 2021, 5:17 PM IST

मुंबई-आज सुपरस्टार आमिर खानचा वाढदिवस. तो मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून जाणला जातो. प्रत्येक वाढदिवशी आमिर खान काहीतरी नवे करण्याचा संकल्प करतो. त्याच संकल्पानुसार आमिर मराठी शिकला आणि तो आता मराठीत अस्खलितपणे संवाद साधू शकतो. त्याच्या मते महाराष्ट्रातील मुंबईत लहानाचा मोठा होऊनही त्याला मराठी येत नव्हती हे त्याला स्वतःला खटकत होते म्हणून त्याने मराठी शिकण्याचा चंग बांधला आणि तो यशस्वीही झाला. त्याला निरनिराळ्या डिशेस खायला आवडतात. खासकरून आपल्या आईच्या हातच्या. म्हणून त्याने आपल्या आईकडून कुकिंग शिकून घेतले व तो आता स्वयंपाकघरात, जसा वेळ मिळेल तसा, थोडाफार वेळ घालवितो, निरनिराळ्या डिशेस बनविण्यासाठी.


चित्रपटासाठी काहीही करण्याची तयारी
चित्रपटांसाठी असलेले आमिर खानचे पॅशन सर्वांनाच ठाऊक आहे. तो एखादा चित्रपट करीत असताना त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘लालसिंग चढ्ढा’च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. त्यात बाधा पडू नये म्हणून त्याने चित्रपट प्रदर्शनापर्यंत मोबाईल वापराने सोडून दिले. आधीच्या चित्रपटांदरम्यानही त्याने अतरंगी गोष्टी केल्या आहेत. लगान चित्रपटावेळी त्याला कानात बाली घालणे महत्वाचे होते. चापाच्या बालीचा पर्याय सोडून त्याने हिंदू धर्मियांप्रमाणे कान टोचून घेतले व चित्रपटभर बाली मिरवली. ‘तारे जमीन पर’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ज्यात तो एका चित्रकला शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. आपल्या भूमिकेत यथार्तपणा आणण्यासाठी तो चित्रकला शिकला जेणेकरून चित्र रेखाटताना त्याच्या हालचालींमध्ये खरेपणा जाणवेल.


१९८८ साली अभिनयक्षेत्रात पदार्पण
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिर खानने १९८८ साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्या काळी बहुतांश कलाकार ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ या वृत्तीला धरून चालणारे होते. परंतु त्याहीवेळी आमिर खानचा अतरंगीपणा दिसून आला होता. कलाकार, दिग्दर्शक हे सारेच नवीन असल्यामुळे चित्रपटाचे बजेट तुटपुंजे होते. त्यावेळी आमिरने स्वतःने एका साथीदाराला बरोबर घेऊन त्या चित्रपटाची पोस्टर्स बसेस आणि ऑटोरिक्षा वर चिकटवली होती. तसेच आमिर खानने ‘बाझी’ चित्रपटात स्त्रीवेषात एक ‘कॅब्रे’ पेश केला आणि त्यासाठी त्याने पूर्ण बॉडी ‘वॅक्स’ केली होती.
तर मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला ईटीव्ही भारत मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ABOUT THE AUTHOR

...view details