मुंबई- आज तेलगू चित्रपटांतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने ट्वीट केले आहे की, "प्रिय गुरू राजामौली तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जाणून घेणे आणि आरआरआरमध्ये तुमच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. सर एस. एस राजामौली यांना नेहमीसाठी हार्दिक शुभेच्छा."