मुंबई- मुंबई सागाच्या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी जुन्या बॉम्बे स्टाईलमध्ये एकमेकांना भिडताना दिसत आहेत.जॉन अब्राहमने आपल्या ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना लिहिलंय की, ''बंदुक तो सिर्फ शौक के लिए रखता हूँ, डराने के लिए नाम ही काफी है - अमर्त्य राव! मुंबई सागाचा ट्रेलर आता आला आहे. सिनेमा १९ मार्चला रिलीज होईल.''
तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बॉम्बेचे मुंबईत रूपांतर होणाऱ्या काल्पनिक घटनांची झलक मिळते. ट्रेलरमध्ये जॉन आणि इमरानच्या व्यक्तीरेखांचा ओळख प्रेक्षकांना करुन देण्यात आली आहे. जॉन अमर्त्य रावची भूमिका साकारतो आहे. रस्त्यावर वाढलेला अमर्त्य राव शहरावर राज्य करण्याचे स्वप्न पाहताना दिसतो. इम्रान हाश्मी अमर्त्य रावला विरोध करतो आणि तो बॉम्बे शहर हिंसामुक्त करण्याच्या मोहिमेवर आहे.
ट्रेलरमध्ये अभिनेते महेश मांजरेकर, सुनील शेट्टी आणि चित्रपटातील गुलशन ग्रोव्हरच्या पात्रांची झलक पाहायला मिळते. १९८० ते ९० च्या दशकात सेट केलेल्या मुंबई सागामध्ये काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, प्रेतिक बब्बर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी काबिल, शूटआऊट अॅट वडाळा आणि कांटे यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय गुप्ता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.