मुंबई - दिग्दर्शक अभिषेक कपूरने 'काय पो छे' आणि 'केदारनाथ' यासारख्या चित्रपटातून सुशांतसिंह राजपूतसोबत काम केले आहे. सुशांतचे असे अचानक निघून जाणे सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे. अभिषेक यांनी सांगितले की केदारनाथच्या रिलीजनंतर तो हरवलेल्या अवस्थेत असायचा. केदारनाथच्यावेळी त्याची खूप काळजी वाटत होती. कारण त्यावेळी त्याच्याबद्दल मीडियामध्ये खूप काही लिहून आले होते. सिनेमाच्या रिलीजनंतर ज्या प्रकारे सारा अली खानला प्रेक्षकांचे प्रेम मिळत होते तसे सुशांतला मिळत नव्हते.
अभिषेकने सुशांतबद्दल बोलताना सांगितले, ''मी गेली दीड वर्षे त्याच्याशी बोललो नाही. त्याने पन्नासवेळा आपला नंबर बदलला असेल. मला आठवतं जेव्हा केदारनाथ रिलीज झाला होता तेव्हा मीडियाने त्याच्यावर निशाणा साधला होता. काही झाले होते मला माहिती नाही. सुशांत स्पष्ट पाहात होता की त्याला जास्त प्रेम मिळत नाही. सर्वजण साराचे कौतुक करीत होते. तो माझ्याशीही बोलत नव्हता. तो हरवल्यासारखा राहायचा. मी त्याला दुसऱ्यांदा मेसेज केला, हा त्याला मी केलेला शेवटचा मेसेज होता.
हेही वाचा - सलमानचे 'बिइंग ह्यूमन' म्हणजे फक्त देखावा - अभिनव कश्यप