महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिनेश विजानच्या 'दसवी'मध्ये अभिषेक साकारणार 'दहावी फेल' मुख्यमंत्री - चित्रपटामध्ये यामी गौतम

सुजय घोषच्या बॉब बिस्वास चित्रपटाचे शूटिंग संपवल्यानंतर अभिषेक बच्चन आता दिनेश विजानच्या 'दसवी'च्या शूटिंगला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात करणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन दहावीत फेल झालेल्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणार आहे. यात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे.

Abhishek Bachchan
अभिषेक बच्चन

By

Published : Feb 5, 2021, 4:58 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा निर्माता दिनेश विजानच्या आगामी चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. अभिषेक 'दसवी' नावाच्या या चित्रपटात १० वीत अपयशी ठरलेला मुख्यमंत्री म्हणून काम करताना दिसणार आहे.

दसवी हा आजच्या समाजातील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा एक राजकीय विनोदी नाट्यमय चित्रपट आहे. अभिषेक यामध्ये दहावीत अपयशी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक एका भ्रष्ट राजकारण्यांच्या प्रवासाची कथा यातून मांडणार असल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्राने सांगितले.

या चित्रपटामध्ये यामी गौतम आणि निमरत कौर यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. यात यामी हरियाणवी मुलीची भूमिका करणार असून यासाठी ती या भाषेचे धडे गिरवत आहे. तसेच दसवीच्या भूमिकेसाठी देहबोलीच्या बारीक गोष्टींमवरही काम करत आहे.

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये शक्तीशाली भूमिकेत झळकणार अजय देवगण

ABOUT THE AUTHOR

...view details