मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ५ फेब्रुवारीला ४४ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला बऱ्याच कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्यानेही त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. सध्या अभिषेक आपल्या आगामी 'बॉब विश्वास' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या सेटवरही त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याला सेटवर खास सरप्राईझ मिळाले.
सोशल मीडियावर मुकेश छाबरा यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन अभिषेकचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अभिषेकच्या बऱ्याच फोटोंचा संग्रह असलेले पोस्टर पाहायला मिळते. त्याच्या लहानपणाच्या फोटोंचाही या पोस्टरमध्ये समावेश आहे.
ऐश्वर्या रायनेही सोशल मीडियावर फॅमिली सेलेब्रिशनचा फोटो शेअर केला होता. तसेच आराध्या आणि अभिषेकसोबतचा एक सेल्फी देखील पोस्ट करुन तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.