मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन सोबत व्यावसायिक पुनर्मिलन होण्यासाठी संधीची आतुरतेने वाट पाहतोय.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी ढाई अक्षर प्रेम के (२०००), कुछ ना कहो (२००३), बंटी और बबली (२००५), उमराव जान (२००५), धूम 2 (२००६) गुरू (२००७) आणि रावण (२०१०) या सारख्या चित्रपटात एकत्र काम दोघांनी एकत्र काम केले होते. गेली १० वर्षे त्यांनी पडद्यावर स्क्रिन स्पेस शेअर केलेली नाही.
या जोडप्याने अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन'मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करणे अपेक्षित होते पण चित्रपटाचे शुटिंग कधीच सुरू झाले नाही. अभिषेकला मात्र ऐश्वर्याबरोबरच्या ऑनस्क्रीन पुनर्मिलनाची आशा आहे. नुकत्याच वेब अॅलॉइडला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने म्हटले आहे की तो पुन्हा ऐश्वर्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करीत आहे.