मुंबई- २०१८ मध्ये 'मनमर्जिया' चित्रपटात अभिषेक बच्चनने काम केले होते. त्यानंतर तो रुपेरी पडद्यापासून लांब होता. यावेळी तो शाहरुख खानसोबत काम करीत आहे. गुरूवारी अभिषेकने कोलकात्यात 'बॉब विश्वास'च्या शूटींगला सुरूवात केली.
शूटींगच्या पहिल्या दिवसाबद्दल अभिषेकने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाबद्दलचा खुलासाही केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "नोमोश्कार, 'बॉब विश्वास' डे वन"