महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रपटांसाठी अर्पिता खानशी लग्न केल्याच्या आरोपावर आयुष शर्माने केला खुलासा - सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा

आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी सात वर्षांपूर्वी लग्न केले होते, परंतु चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीशी लग्न केल्याबद्दल त्याला अजूनही टीकेचा सामना करावा लागत आहे. त्याच्या मते ही गोष्ट चुकीची आहे. अर्पितासोबतच्या त्याच्या लग्नाच्या चर्चेबद्दल त्याचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.

आयुष शर्मा आणि अर्पिता खान
आयुष शर्मा आणि अर्पिता खान

By

Published : Jan 14, 2022, 5:16 PM IST

मुंबई - अभिनेता आयुष शर्माने सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आत्तापर्यंत त्याने दोन चित्रपट केले आहेत. परंतु त्याच्यावरत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्पिताशी लग्न केल्याची टीका होत असते. अशा आरोपांवर प्रतिक्रिया देताना आयुष म्हणाला की, मला कामाशिवाय काहीही स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही.

आयुषने त्याच्या पहिल्या लवयात्री या चित्रपटामध्ये लव्हरबॉयची भूमिका केली होती. अलिकडेच रिलीज झालेल्या त्याच्या अंतीम : द फायनल ट्रुथ चित्रपटामध्ये त्याने एका भयानक गुंडाची भूमिका केली होती. त्याला अद्यापही सलमान खानच्या बॅनरबाहेरचा एकही चित्रपट मिळालेला नाही. यामुळे वरवर पाहता ट्रोल्सला चालनामिळते आणि ते आपली मतं मांडतात की, अर्पिताशी लग्न करण्यामागे आयुष शर्मा गुप्त हेतू होता. मात्र त्याला हे मान्य नाही.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आयुषला या विषयावर छेडले असता तो म्हणाला : "मी अर्पिताशी लग्न का केले असाही प्रश्न ते विचारतात. प्रत्येकाने असे गृहीत धरलंय की मी तिच्याशी चित्रपटांसाठी लग्न केले आहे. मला आश्चर्य वाटेतं की माझी पत्नी इतकी कच्ची नाही की ती मला ओळखत नाही. पण मग मला असे वाटतं की या संवादाला महत्त्व देऊन मी अर्पितासोबतच्या माझ्या नात्याचा अनादर का करू?"

"मला फक्त माझे काम समजावून सांगायचे आहे, त्यापलीकडे मी कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. मला सलमान भाईसोबत वेळ घालवायला आवडतो कारण त्यांच्याकडे कामाचा भरपूर अनुभव आहे, त्यामुळे एक अभिनेता म्हणून मला मदत होते," तो पुढे म्हणाला.

आयुष आणि अर्पिताचे नोव्हेंबर २०१४ मध्ये लग्न झाले आणि त्यांना अहिल आणि आयत ही दोन मुले आहेत.

हेही वाचा -झुंडशाहीला धक्का देणार, माझ्या भूमिकेत फरक नाही: अभिनेता किरण माने

ABOUT THE AUTHOR

...view details