महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर खानचा मुलगा जुनैदने 'महाराजा' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात!! - शालिनी पांडे

आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराजा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी जुनैदची बहीण इरा खानने या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

Aamir Khan's son Junaid's
आमिर खानचा मुलगा जुनैद खान

By

Published : Feb 15, 2021, 7:58 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानने आपल्या अभिनेता वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुनैदने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्याचे नाव महाराजा असे आहे.

जुनैदच्या पदार्पणाच्या बातम्या गेल्या काही काळापासून वेबसाईट्सवर झळकत होत्या. तथापि, त्याची छोटी बहिण इरा खान हिने नुकतीच इंस्टाग्राम पोस्ट लिहून या बातमीला दुजोरा दिल्याचे दिसते. तिने थेट अधिकृत घोषणा केली नसली तरी आपला भाऊ शूट करीत आहे हे सांगायला ती विसरलेली नाही.

इराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती भाऊ जुनैदसमोर गुढघे टेकून बसल्याचे दिसते. ती भावाला पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. जुनेदने यापूर्वी तिच्या नाटकात काम केले आहे आणि त्याची व्यावसायिकता अतुलनीय आहे, असे इराने सांगितले आहे.

आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि इरा खान

"जुन्नू! त्याचं हे पहिलं नाटक किंवा त्याचा पहिला कार्यक्रम किंवा आम्ही एकत्र केलेले नाटक नाही तर आज त्याचा शूटिंगचा पहिला दिवस होता. आणि मला हा फोटो खूप आवडतो. तो काही वर्षांपासून अभिनय करतोय पण तो अजून नवीन आहे. त्याने माझे नाटकदेखील केले आहे म्हणूनच मी त्याच्यासोबत असायला हवे ... पण इतर सर्व गोष्टींपेक्षाही मी आता त्याची धाकटी बहीण आहे, " असे इराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

ती पुढे म्हणाली, "त्यांची व्यावसायिकता अतुलनीय आहे. मी त्याच्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याने सर्वांना बाजूला सारेपर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही, असेही इराने पुढे म्हटलंय. भावाने चित्रपटाविषयी काहीही बोलण्याबद्दल मला मज्जाव केलाय. हे खूप त्रासदायक आहे, असेही तिने म्हटलंय.

आमिर खानचा मुलगा जुनैद खान

सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'महाराजा' या चित्रपटात 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - सिद्धांत चतुर्वेदी, मालविका मोहननची भूमिका असलेला 'युद्ध्रा'ची अ‍ॅक्शन-पॅक टीझरद्वारे घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details