महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित! - Aamir Khan latest news

आमिर खानची बहुप्रतीक्षित फिल्म 'लाल सिंह चड्ढा' आधी 2020 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते, मात्र आता हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर खान आणि ख्रिसमसच नातं तस फार जुने आहे. नाताळ दरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत.

aamir-khans
लाल सिंह चड्ढा

By

Published : Aug 10, 2020, 4:57 PM IST

मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट निर्माते आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत, कारण या काळात आरोग्य आणि लोकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. आमिर खानची बहुप्रतीक्षित फिल्म 'लाल सिंह चड्ढा' आधी 2020 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते, मात्र आता हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.



आमिर खान आणि ख्रिसमसच नातं तस फार जुने आहे. नाताळ दरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत, ज्यात 3 इडियट्स, पीके, धूम 3, दंगल इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' टॉम हैंक्सच्या 'फॉरेस्ट गम्प'वर आधारित आहे. लॉकडाउनच्या आधी, चंदिगड आणि कोलकातामध्ये चित्रपटाच्या काही भागाचे शूट झाले आहे. जेव्हा देशातली स्थिती अवघड बनली आहे तेव्हा आमिरने आपल्या चित्रपटाच्या रेकीसाठी तुर्कीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.


जेव्हा निर्मात्यांनी आमिर खानचा शीख व्यक्तिरेखेतील फर्स्ट लुक जारी केला होता तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. यातच सद्स्थिती लक्षात घेऊन, आमिर आणि निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणा केली असून ती या डिसेंबरवरून पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. कारण या चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज करायचा त्याचा मानस असून त्यासाठी वर्षभर थांबायची त्याची तयारी आहे.

हेही वाचा - सुशांतच्या मृत्यूनंतर कंपनीच्या आयपी अॅड्रेसमध्ये दोनदा बदल
आमिर खान प्रोडक्शन्स ची 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा वायकॉम18 स्टूडियो द्वारे प्रस्तुत होणार असून, ज्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच मोना सिंह एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी द्वारे लिखित आणि अद्वैत चंदन द्वारे दिग्दर्शित करण्यात आला असून प्रीतम यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीतलेखन या सिनेमाला लाभले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details