मुंबई - आमिर खान प्रेक्षकांना नेहमीच धक्के देत असतो. आता तो चक्क ‘आयटम सॉंग’ करताना दिसणार आहे. ‘हरफन मौला’ या कॅब्रे गाण्यावर आमिर खान एली अवराम सोबत थिरकलाय. हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे, तसेच विशाल ददलानी आणि झारा खान यांनी गायले आहे. स्वीडिश सौंदर्यवाती एलीने सांगितले की, ‘कोरिओग्राफर्स बॉस्को-सीझरच्या हुक स्टेपसह तिने आणि आमिरने केलेला हा कॅबरे ब्रॉडवे आणि जाझ संगीत-नृत्याचे संमिश्रण आहे. या गाण्याचे चित्रीकरण जवळपास पाचेक दिवस सुरु होते. आमिर खान बरोबर नृत्य करणे माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव होता.’
‘हरफन मौला’ हे गाणे ‘कोई जाने ना’ या चित्रपटातील असून याचे दिग्दर्शन अमीन हाजी करीत आहे. अमिरा दस्तूर आणि कुणाल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात आमिर खान पाहुणा कलाकार म्हणून दिसेल. खरंतर आमिर आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक एकमेकांना दोन दशकांहून अधिक वर्षे ओळखतात. दोघेही घनिष्ठ मित्र आहेत व जेव्हा अमीनने या चित्रपटाची जुळवाजुळव सुरु केली होती तेव्हाच आमिरने त्याला प्रॉमिस केले होते की तो त्याच्या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करेल. आमिर आपल्या मैत्रीला जागला आणि शूटला हजार झाला. येथे असे नमूद करावेच लागेल की आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ च्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये प्रचंड बिझी आहे आणि कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याने चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मोबाईल न वापरण्याचा निर्णय घेतलाय. तरीही आपल्या मैत्रीखातर, दिलेल्या शब्दाला जागत आमिर खानने हे गाणे दिग्दर्शकाच्या संतुष्टीपर्यंत चित्रित केले.
आमिर खानचे ‘आयटम सॉंग’, एली अवराम सोबत! - Eli Avram latest news
‘हरफन मौला’ या कॅब्रे गाण्यावर आमिर खान एली अवराम सोबत थिरकलाय. हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे, तसेच विशाल ददलानी आणि झारा खान यांनी गायले आहे. ‘हरफन मौला’ हे गाणे ‘कोई जाने ना’ या चित्रपटातील असून याचे दिग्दर्शन अमीन हाजी करीत आहे.
हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादात; शीर्षक बदलण्याची आमदार अमिन पटेल यांची मागणी
आमिर खानला ‘मिळविण्या’ संदर्भात अमीन हाजी म्हणाला, ‘कुठल्याही प्रसंगी माझ्या आयुष्यात आमिर नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. सिनेमा, लेखन आणि दिग्दर्शन या प्रांतांत त्याने मला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. आमिरला हे गाणं आवडलं होतं, ते वेगळं आहे म्हणून आणि मी त्याचा आभारी आहे की त्याने या गाण्याचा एक भाग होण्याची तयारी दर्शविली. या गाण्यातील रिदमवर एलीने नृत्य-कहर केलाय. हे गाणे नजीकच्या काळातील कॅबरे संगीत आणि नृत्य यांचा उत्तम आविष्कार असून जबरदस्त व्हिज्युअल आणि आमिर-एलीची सिझलिंग केमिस्ट्री याला चार चांद लागलेत.’
टी-सिरीजचे भूषण कुमार म्हणाले, “रचना, गीत, संगीत, नृत्य सर्व एकत्रितपणे हरफन मौला ला व्हिज्युअल ट्रीट आहे. गाण्यातील आमिर आणि एलीची केमिस्ट्री मनमोहक आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडिओ बनविला गेला आहे त्याद्वारे प्रत्येक फ्रेम लक्षणीय आहे. हे गाणे प्रत्येकाचे आवडते ठरणार आहे याबद्दल दुमत नसावे,’
आमिर खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले, “अमीन, माझ्या मित्रा, तू लगानपासून खूप दूरपर्यंत पोहोचला आहेस. भूषण, टी-मालिका आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, कोई जाने ना!
या गाण्याचे शूटिंग खरोखरच खूप एन्जॉय केले, आपल्याकडे किती छान टीम आहे! सीझर, बॉस्को, मनोज, दीपंकर, अवान, नानाव, रुशी, मनोशी, बल्लू, अडेले, तनिष्क, विशाल, जारा आणि या सर्वांनी, माझ्या नाचण्यातील सर्व त्रुटी लपविणारी जबरदस्त डान्सर एली ;-)!
आणि आभारी आहे स्नेहा, विवेक आणि जूही, तुम्ही 'सर्व, तुमच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.
आशा आहे की आपणा सर्वांना गाण्यासारखे आवडेल!
हा चित्रपट एक रोमांचक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे (अशी आशा आहेच, अमीन, आम्हाला निराश करू नकोस!) सस्पेन्स थ्रिलर 'कोई जान ना' हा चित्रपट येत्या २ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे."
अमीन हाजी लिखित, दिग्दर्शित आणि भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि अमीन हाजी फिल्म कंपनीने बनविलेला ‘कोई जान ना’ तो येत्या २ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.
हेही वाचा - पीफ्फ : कोरोनामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर