राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेला थ्री एडियट एका दशकापूर्वी रिलीज झाला होता. जगभरात याला भरपूर नावाजले गेले. चीनसारख्या देशातही प्रचंड लोकप्रियता चित्रपटाला मिळाली होती. तैवान, जपान, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया या देशातही हा चित्रपट रिलीज झाला होता.
जपानमधील थिएटर बंद होण्यापूर्वी प्रेक्षकांनी पाहिला आमिरचा 'थ्री एडियट'!! - Aamir Khan latest news
थ्री एडियट या चित्रपटाने भारतासह जगभरातील प्रेक्षकांना भुरळा पाडली होती. २००९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ११ वर्षानंतर पुन्हा चर्चेत आला आहे.

थिएटर बंद होण्यापूर्वी प्रेक्षकांनी पाहिला 'थ्री एडियट'
जपानमधील ओसाका येथी एक सिनेमा थिएटर कायमचे बंद करण्यात येत आहे. या थिएटरमध्ये शेवटचा शो थ्री एडियट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद तर दिलाच पण,विशेष म्हणजे शो हाऊसफुल्ल ठरला.
थिएटर मालकाने ट्विट करीत ही माहिती दिली आहे. या चित्रपट आमिर खान, करिना कपूर, बोमन इराणी, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.