महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर खानची प्रतिज्ञा.. ‘लालसिंग चड्ढा’ प्रदर्शित होईपर्यंत 'ही' गोष्ट केली त्याग! - आमिर खानचा लाल सिंग चड्डा

सुपरस्टार आमिर खान नेहमीच अकल्पनीय गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने प्रतिज्ञा केलीय की ‘लालसिंग चड्ढा’ प्रदर्शित होईपर्यंत आपल्या मोबाईल फोनला स्पर्श सुद्धा करणार नाही. त्याने चक्क आपला सेल फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

aamir khan stops using phone
aamir khan stops using phone

By

Published : Feb 1, 2021, 9:35 PM IST

मुंबई - आमिर खानला ‘ मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते व ते त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्याचा आगामी ‘लालसिंग चड्ढा’, जोपर्यंत प्रदर्शित होत नहीं तोपर्यंत त्याने एक गोष्ट त्याग केली आहे. खरंतर आजच्या युगात तांत्रिक क्रांती घडली असून इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काहींना तर त्याचे व्यसनच जडले आहे व यात अनेक सेलिब्रिटीज पण मोडतात. या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकजण दर पंधरा मिनिटांनी सतत आपला मोबाईल ‘चेक’ करीत असतो. अनेकांना त्याशिवाय जीवनाची कल्पना करणेही कठीण वाटते. पण सुपरस्टार आमिर खान नेहमीच अकल्पनीय गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने प्रतिज्ञा केलीय की ‘लालसिंग चड्ढा’ प्रदर्शित होईपर्यंत आपल्या मोबाईल फोनला स्पर्श सुद्धा करणार नाही. त्याने चक्क आपला सेल फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्यामते सेल फोन त्याच्या कामामध्ये खंडच जास्त पाडत होता व त्यामुळेच त्याने हा कठोर निर्णय घेतलाय. आमिर खान नेहमी आपल्या भूमिकांमध्ये झोकून देऊन काम करत असतो. तो ज्या प्रकल्पांवर काम करीत असतो, त्यात पूर्णपणे आत्मसमर्पण करतो हे सर्वांना ठाऊक आहे, पण 'लालसिंग चड्ढा' सारखा भावुक व महत्वाचा चित्रपट करीत असताना त्याचा फोन अडथळा बनत होता हे जाणवल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.

‘ख्रिसमस’ आमिर खानसाठी नेहमीच लकी ठरला आहे. पीके, दंगल, धूम, तारे जमीन पर, गजनी असे त्याने एका पेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. ‘लालसिंग चड्ढा’ या विषयावर आपले संपूर्ण लक्ष समर्पित करणाऱ्या या अभिनेत्याचे अखंड चित्रीकरण व पोस्ट प्रॉडक्शन एकाच वेळी सुरु असून सर्वांचे ‘डेड-लाईन’ वर लक्ष आहे.

आमिर खान चा 'लालसिंग चड्ढा' टॉम हँक्स अभिनित ‘फॉरेस्ट गम्प्स’ चा अधिकृत रिमेक आहे ज्याची कथा रूपांतरित केलीय मराठमोळ्या व आमिरचा ‘रंग दे बसंती’ सहकलाकार अतुल कुलकर्णी याने. खरंतर गेल्या ‘ख्रिसमस’ ला हा चित्रपट प्रकाशित होणार होता परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन व करीना कपूर-खानचे गर्भारपण यामुळे चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल करावा लागला व कोणतीही घाई न करता आपल्या मनाप्रमाणे चित्रपट बनवून आमिर खान यावर्षीच्या नाताळात हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे.

‘३ इडियट्स’ नंतर आमिर-करिना जोडी 'लालसिंग चड्ढा' मधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details