महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर खानच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, सोशल मीडियावरुन दिली माहिती - लाल सिंह चड्ढ़ा

आमिर खानच्यासोबत काम करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यावर त्यांनी आता मात केली असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आमिरने आपल्या आईचीही कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय.

AAMIR-KHAN
आमिर खान

By

Published : Jun 30, 2020, 2:52 PM IST

मुंबई - आमिर खानने आपल्या सोशल मीडियावरुन सांगितले आहे, की त्याच्या काही सहकाऱ्यांनी कोविड-१९ चे सकारात्मक परिक्षण केले आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे सांगताना बीएमसीचे आभार मानले आहेत.

या घटनेनंतर ते पूर्णपणे क्वारंटाईन झाले आहेत. तो आपल्या आईचीही कोरोना टेस्ट करणार आहे. मुंबईमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - सुशांतच्या कुटुंबियांनी मानले चाहत्यांचे आभार, त्याच्या अनोख्या गुणांचा केला खुलासा

कामाच्या पातळीवर आमिर खान आगामी 'लाल सिंह चड्ढ़ा' या चित्रपटात काम करत आहे. यामध्ये करिना कपूरसोबत त्याची भूमिका आहे. काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की या चित्रपटात कोरोना महामारीची परिस्थितीही दाखवली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details