मुंबई - अभिनेता आमिर खानवर सध्या जोरदार टीकेची झोड उठवली जात आहेत. तो काही मुलांसोबत क्रिकेट खेळत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात आमिरने किंवा मुलांपैकी कोणीही मास्क घातलेला नाही. त्यामुळे तो किती बेफिकीर आहे असे म्हणत सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे.
सेलेब्रिटी फोटोग्राफर विराल भायानी यांनी आमिर खानचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. त्यानंतर आमिर खानच्या विरोधात सोशल मीडियात वादळ निर्माण झाले. या व्हिडिओत आमिर मुंबईमध्ये मास्क न घालता क्रिकेट खेळताना दिसतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिर बराच ट्रोल होत आहे.
सोशल मीडिया युजर्सनी आमिरच्या या बेजबाबदारपणावर नाराज व्यक्त करायल्या सुरूवात केली.