मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानला त्याच्या चित्रपट व व्यक्तीरेखा निवडीबद्दल चिकीत्सक असल्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. ही बिरुदावली अनेक दशकांपासून त्याच्याशी जोडलेली आहे. पण त्याची दंगल चित्रपटाची सह-कलाकार सान्या मल्होत्रा आमिर खानबद्दलच्या लोकप्रिय मताशी सहमत नाही. आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट नाहीत, असे ती म्हणाली.
२०१६ मध्ये आमिर खान म्हणाला होता की, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटल्यामुळे आपल्यावर दबाव येतो आणि त्याचा या बिरुदावलीवर विश्वास नाही. याबद्दल स्पष्टीकरण देताना आमिरने सांगितले होते की, ''याचा माझ्यावर दबाव येतो कारण माझा यावर विश्वास नाही. त्यामुळे हे शीर्षक चुकीचे आहे. माझ्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट ही उपाधी योग्य नाही. मिस्टर पॅशीनेट व्हा, मीच तोच आहे. "