महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'छिछोरे'चा ट्रेलर पाहून आमिर खान म्हणतो... - वरूण शर्मा

या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळेल, अशी अपेक्षा करतो, असं आमिरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आमिरशिवाय अक्षय कुमार, वरूण धवन आणि आलिया भट्ट या बॉलिवूड कलाकारांनीही छिछोरेच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

'छिछोरे'च्या ट्रेलरवर आमिरची प्रतिक्रिया

By

Published : Aug 5, 2019, 10:04 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खानने नितेश तिवारी यांच्या दंगल चित्रपटात भूमिका साकारली होती. सत्य घटनेवर आधारित या बायोपिकला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर आता नितेश तिवारी छिछोरे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

रविवारी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, तिवारी यांनी प्रदर्शित होण्याआधीच हा ट्रेलर आमिरला दाखवला होता. यावर त्याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नितेश जी तुम्ही दाखवलेला तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर खरच खूप आवडला. या चित्रपटासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळेल, अशी अपेक्षा करतो, असं आमिरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आमिरशिवाय अक्षय कुमार, वरूण धवन आणि आलिया भट्ट या बॉलिवूड कलाकारांनीही छिछोरेच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. मैत्रीदिनादिवशी हा ट्रेलर पाहायला मिळाला, या गोष्टीचा खूप आनंद आहे. यात माझ्या श्रद्धा आणि वरूण शर्मा या जवळच्या दोन मित्र-मैत्रीणीची भूमिका आहे, असं वरूणनं म्हटलं आहे. तर आलियाने मित्र सगळं काही खास आणि विनोदी करून टाकतात, असं म्हणत हा ट्रेलर शेअर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details