मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या दिल्लीत लालसिंग चड्ढा चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. शूटिंगदरम्यान आमिर खानला त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. सेटवरील एका सूत्रांनी सांगितले की, "काही अॅक्शन सीन्सच्या शूटिंगदरम्यान आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. मात्र चित्रपटाच्या शूटिंगला यामुळे अडथळा आला नाही. आमिरने काही औषधांच्या मदतीने पुन्हा शूटिंग सुरू केले.
'लालसिंग चड्ढा' टीम शूटिंगसाठी सर्व आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा उपायांचा वापर करीत आहे. अगोदरच्या एका धावण्याच्या सीन्सचा भाग शूट होत असताना शरीरावर ताण आल्याने आमिरवर हा प्रसंग ओढवला.