मुंबई - आमिर खान आणि एली अवराम यांनी क्लब साँगवर थिरकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जात आहे. लालसिंग चड्ढा चित्रपटामध्ये बिझी असतानाही आमिरने आपल्या जवळच्या मित्र अमीन हाजी याच्यासाठी वेळ काढला होता. जयपूरमध्ये 'कोई जाने ना' या चित्रपटाचे शुटिंग पार पडले होते. त्यातील क्लब साँगचा हा व्हिडिओ लीक झाला आहे.
आमिरने क्लब साँगच्या शूटिंगला जाण्यापूर्वी नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसच्या टीमबरोबर त्याच्या नृत्याच्या स्टेप्सवर काम केले होते. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार जयपूरमध्ये एक खास क्लब सेट उभारण्यात आला होता, जिथे हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. 'कोई जाने ना' ही एक मनोवैज्ञानिक थ्रिलर फिल्म आहे, ज्यात कुणाल कपूर आणि अमिरा दस्तूर मुख्य भूमिकेत आहेत.