मुंबई- बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान 14 मार्च रोजी 57 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स सोशल मीडियावर त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्याच्या खास मित्रांनीही आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर खानने बॉलिवूडवर तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. त्याच्या हिट चित्रपटांची यादी मोठी आहे. पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने गेल्या वर्षी सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. आता आमिर खानने खुलासा केला आहे की त्याची माजी पत्नी किरण रावने त्याला वाढदिवसाची आतापर्यंतची सर्वोत्तम भेट दिली आहे.
मीडियातील एका बातमीनुसार, एका मुलाखतीत आमिर खानने माजी पत्नी किरण रावबद्दल मोठा खुलासा केला आहे. आमिरने सांगितले की, माजी पत्नी किरण रावने त्याला आतापर्यंतचे सर्वोत्तम वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. आमिरने सांगितले की, अलीकडेच त्याची माजी पत्नी किरण रावशी संभाषण झाले आणि त्याने किरणला त्याच्या स्वतःतील कमतरता आणि कमकुवतपणाची यादी देण्यास सांगितले ज्या तो सुधारू शकेल.
आमिर म्हणाला, 'तिने मला 10 ते 12 गुणांची यादी दिली आहे, याची नोंद मी माझ्याकडे ठेवली आहे. त्यामुळे माझ्यासाठी वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट आहे'. आमिरने पुढे सांगितले की, ''किरणने त्याच्या कमतरता आणि कमकुवतपणाची जी यादी दिली आहे त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आहे. आमिर म्हणाला, 'म्हणूनच मला वाटतं, ही माझी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे, तिने माझ्यातील उणीवा अतिशय सुंदर आणि प्रामाणिकपणे सांगितल्या आहेत ज्या मला आजपर्यंत कोणीही सांगितल्या नव्हत्या.''