मुंबई- आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. तो लवकरच पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज होत आहे. गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करण्याचा त्याने पक्का निर्धार केला आहे.
आमिर खानने आपला निर्णय बदलला, 'मोगल'मध्ये साकारणार भूमिका - बायोपिकमध्ये
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अखेर सुभाष कपूर यांच्या आगामी 'मोगल' या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खान
सिनेसमिक्षक आणि ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिलंय, "हे अधिकृत आहे...आमिर खानने आपला निर्णय बदला आहे. सुभाष कपूर यांच्यासोबत 'मोगल'मध्ये काम करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान मध्यवर्ती भूमिकेत असेल."
सुभाष कपूर यांच्यावर महिलेचे शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मीटू मोहिमेचा फटका त्यांना बसला होता. त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.
Last Updated : Sep 10, 2019, 3:23 PM IST