मुंबई- सुपरस्टार आमिर खानने सोमवारी सांगितले की तो स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सच्या हिंदी रिमेकचा एक भाग असू शकतो. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट कथितरित्या एका गर्विष्ठ, मद्यधुंद प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे जो बौद्धिकदृष्ट्या अक्षम लोकांच्या टीमला प्रशिक्षण देतो.
'शुभ मंगल सावधान' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांच्याशी या हिंदी रिमेकबाबत आमिर खान बोलणी करीत आहे. आमिर खान ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने त्याला विचारले असता पत्रकारांशी बोलताना आमिर म्हणाला, "मी अजून माझ्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही, तुम्हाला कसे कळले? नियोजन सुरू आहे, याबद्दल मी तुम्हाला लवकरच कळवेन.''