महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आमिर आणि पत्नी किरणनं साताऱ्यात केलं श्रमदान - pani foundation

नुकतंच आमिरने पत्नी किरणसह साऱयात श्रमदान केलं आहे. आमिर आणि किरणच्या महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठीच्या प्रयत्नाला गावागावातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे

आमिर आणि पत्नी किरणनं साताऱ्यात केलं श्रमदान

By

Published : May 1, 2019, 3:19 PM IST

मुंबई- आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांत श्रमदान करून पाणी समस्या सोडवण्यात येत आहे. यासाठी आमिर खान स्वतः सामान्यांच्यात जाऊन नागरिकांना या कामासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता श्रमदान करताना दिसत असतो.

नुकतंच आमिरने पत्नी किरणसह साताऱ्यात श्रमदान केलं आहे. आमिर आणि किरणच्या महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठीच्या प्रयत्नाला गावागावातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर आणि किरणसह गावकरीही श्रमदानासाठी निघालेले दिसत आहेत.

दरम्यान आमिरच्या या कॅम्पियनला अनेक कलाकारांचाही पाठिंबा मिळत असून कलाकारही श्रमदान करत या कामाला हातभार लावत आहेत. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज अभिनेत्री सई ताम्हणकरनेही कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे श्रमदान केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details