मुंबई - सोनाक्षी सिन्हा आणि ईशान खट्टर यांच्यानंतर आलिया भट्टनेही भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नागरिकता संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी एक मोहीम सुरू केलीय. याचाच हा एक भाग आहे.
आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या घटनेच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''विद्यार्थ्यांपासून शिका.'' यापूर्वी सोनाक्षी सिन्हाने घटनेच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर करीत लिहिले होते, "हे तेच आहेत जे आम्ही आहोत. आम्ही जसे आहोत तसेच राहिले पाहिजे."
हेही वाचा -'महाभारता'तील शकुनी मामासोबत ईटीव्ही भारतची खास बातचीत
ईशाननेही राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर करीत लिहिले होते, "आम्ही जगातील सर्वात मोठ्या धर्मनिरपेक्ष देशातील आहोत, या विचारांवर विश्वास ठेऊनच मोठा झालोय, याचा मला गर्व आहे. शांतीपूर्णरित्या आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येकासोबत मी उभा आहे. सर्व सहकाऱ्यांची एकजूटता आणि भलेपणा यासाठी मी प्रार्थना करतो."
आलिया भट्ट म्हणते, 'विद्यार्थ्यांकडून शिका' नागरिकता संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अनेक बॉलिवूड कलाकार ठामपणे उभे राहिले आहेत. यात विक्की कौशल, भूमी पेडणेकर, परिणीती चोपडा, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी, निम्रत कौर, दिया मिर्जा, स्वरा भास्कर, मनोज बाजपेयी, सौरभ शुक्ला, अनुराग कश्यप, अलंकृता श्रीवास्तव, हसंल मेहता यांचा समावेश आहे.