मुंबई- दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आगामी 'मलाल' चित्रपटातून शर्मिन सेहगल आणि मिजान जाफरी हे स्टारकिड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर, आतापर्यंत चित्रपटातील तीन गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
आईशप्पथ तुझ्यावर प्रेम करतो, 'मलाल'मधील आणखी एक मराठमोळ गाणं प्रदर्शित - sharmin sehgal
या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही मराठमोळ टच आहे. आईशप्पथ तुझ्यावर प्रेम करतो, असं या गाण्याचं शीर्षक आहे.

चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही मराठमोळ टच आहे. आईशप्पथ तुझ्यावर प्रेम करतो, असं या गाण्याचं शीर्षक आहे. दिपावलीच्या दिवशी संपूर्ण चाळीतील लोकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत मिजान हे गाणं गाताना दिसत आहे. गाण्यात मिजानच्या नृत्याचीही झलक यामध्ये पाहायला मिळते.
२ मिनीट आणि २५ सेकंदांच्या या गाण्याला हृत्विक तलाशीरकरनं आवाज दिला आहे. तर संजय लिला भन्साळी यांचं संगीत आहे. मंगेश हाडवळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, महावीर जैन आणि संजय लिला भन्साळी यांनी केली आहे. येत्या ५ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.