मुंबई- अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या त्यांच्या लग्नापासून हे जोडपे स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत आहेत पण चाहत्यांना हे पुरेसे वाटत नाही. विकॅट ( VicKat ) च्या चाहत्यांसाठी कॅटरिनाने पती विकीसोबतचे दोन प्रेमाने भरलेले फोटो शेअर केले आहेत.
विकी आणि कॅटरिनाचे नवीन फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक मेजवानी आहेत. कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या दोन सेल्फीमध्ये हे दोघे काही खास क्षण शेअर करताना दिसत आहेत. तिच्या सोशल मीडिया हँडलवर कॅटरिनाने विकीसोबत पहाटे एक सेल्फी पोस्ट केला ज्यामध्ये ती विकीच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. फोटोमध्ये विकी पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे.