मुंबई- बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आजकाल त्यांच्या गेम शो ''कौन बनेगा करोडपती 13'' मुळे चर्चेत आहेत. केबीसी दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या आणि मनोरंजक गोष्टी समजत असतात. अलीकडेच शोमध्ये एका स्पर्धकाने बच्चन यांच्या कपड्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी आपल्या रेनबो जॅकटबद्दलचा रंजक किस्सा सांगितला.
बच्चन यांच्या नातीने दिली खास भेट
अमिताभ यांनी सांगितले की हे जॅकेट त्यांना मुलगा अभिषेक बच्चनने वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट केले होते. त्यानंतर स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या इन्स्टाग्रामवरील नवीन वर्ष साजरा करीत असतानाच्या फोटोबद्दल सांगितले. यामध्ये अमिताभ बच्चन अतिशय स्टायलिश चष्मा परिधान केलेले दिसत आहेत. याबाबत अमिताभ यांनी सांगितले की, त्यांना हा चष्मा त्यांची नात आराध्या बच्चन यांनी दिला होता, जो तिने खास नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आणला होता.