महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनू सूदच्या विरोधात 20 कोटी कर चोरीचे प्रकरण आले समोर - सोनू सूदच्या अडचणी वाढल्या

सोनू सूदने 20 कोटी रुपयांहून अधिक कर चुकवला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर क्राउड फडिंग केल्याचाही आरोप आहे. त्याच्या देशभरातील 28 मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

सोनू सूद
सोनू सूद

By

Published : Sep 18, 2021, 7:40 PM IST


मुंबई - कोरोना महासाथीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गाव गाठण्यासाठी आर्थिक मदतीचा हात दिलेल्या अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोनू सूदवर 20 कोटी कर चुकवल्याचा ठपका

त्याच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांसह अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केल्यानंततर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे.

सोनू सूदवर 20 कोटी कर चुकवल्याचा ठपका

क्राउड फंडिंगचा सोनू सूदकडून वापर

सोनू सूदने बनावट संस्थांद्वारे बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. तर सोनू सूदने एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ कोटी जमा केले आहेत, असे आयकर विभागाने सांगितले आहे.

सोनूच्या २८ मालमत्तांवर छापे

सीबीडीटीने म्हटले आहे की, आयकर विभागाने मुंबईत सोनू सूदच्या विविध भागात आणि पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतलेल्या लखनौ स्थित औद्योगिक क्लस्टरमध्ये छापे आणि जप्तीची कारवाई केली. सीबीडीटीनुसार, मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली, गुरुग्रामसह एकूण २८ मालमत्तांवर सलग तीन दिवस छापे टाकले होते.

सोनू सूदला गरजूंचा आशीर्वाद

दरम्यान, अभिनेता सोनू सूदने कोरोना साथीच्या काळात लोकांना मदत करून खूप प्रशंसा मिळवली होती. अलीकडे सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यासह, तो दिल्ली सरकारच्या देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही बनला होता. आयकर विभागाच्या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणावर ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात, परंतु विजय नेहमीच सत्याचा होतो. सोनू सूदला भारतातील लाखो कुटुंबीयांचा आशीर्वाद आहे, ज्यांना कठीण काळात सोनू सूदची साथ मिळाली होती.

हेही वाचा -सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर; एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याची प्राथमिक माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details