मुंबई- भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली असून त्याचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आनंद एल राय करणार आहेत. याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी रविवारी ट्वीट करुन दिली आहे. त्यांनी लिहिलंय, "विश्वनाथन आनंदची बायोपिक. इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथनवरील बायोपिक. एक शीर्षक नसलेले बायोपिक आनंद एल द्वारा दिग्दर्शित केले जाणार आहे. त्याचे दिग्दर्शन सुंदर एंटरटेनमेंट (महावीर जैन) आणि कलर यलो प्रॉडक्शन (आनंद एल. राय) करणार आहेत. "
पाचवेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांनी ११ डिसेंबर रोजी आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला.
आनंद यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटरवर लिहिले होते, सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल खूप आभार. माझा कुटुंबासोबत एक शांत दिवस पार पडला. यात एक चॉकलेट केक (अरुण आणि अखिल यांनी बनवलेला) सहभागी होता.''