महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"83" असा चित्रपट आहे जो थिएटरला स्टेडियममध्ये बदलून टाकेल - ताहिर - सुनील गावस्करच्या भूमिकेत ताहीर राज भसीन

सिनेमाची थिएटर्स पुन्हा एकदा सुरू होणार असल्यामुळे याचा मोठा आनंद ताहिर राज भसीनला झाला आहे. त्याचा "83" हा चित्रपट प्रदर्शनासाठी प्रतीक्षा करीत आहे. हा चित्रपट पाहताना थिएटर्समधील प्रेक्षकांना क्रिकेटच्या मैदानात बसल्यासारखे वाटेल असे तो म्हणाला.

By

Published : Oct 9, 2020, 12:30 PM IST

मुंबई- भारतात सिनेमाची थिएटर्स पुन्हा उघडणार असल्यामुळे अभिनेता ताहीर राज भसीन आनंदात आहे. "83" या आगामी चित्रपटात तो सुनील गावस्करची भूमिका साकारत आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्याविषयावरचा हा ऐतिहासिक क्रीडा चित्रपट आहे.

याबद्दल ताहीर म्हणाला, "हजारो मल्टिप्लेक्स कर्मचारी आणि व्यावसायिक जे थिएटरवर अवलंबून आहेत, त्यांना काही प्रमाणात आराम मिळेल. हे एक असे क्षेत्र आहे की, जे खूप काळापासून लॉकडाऊनमध्ये आहे. या निर्णयानंतर मी आता थिएटर्समध्ये "83" कधी रिलीज होणार याची बातमी ऐकण्याची प्रतीक्षा करीत आहे. हा एक असा चित्रपट आहे जो थिएटरला स्टेडियममध्ये बदलून टाकेल आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठीच आहे.''

तो म्हणाला, "थिएटर्समध्ये सिनेमासाठी जाण्याअगोदर सुरक्षा विषयक काळजी घेण्याची गरज आहे. मास्क घालणे, अंतर राखणे आणि आपल्यात कोविडची लक्षणे दिसत असतील तर, त्वरित तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. मनोरंजन जगत पूर्ववत होत आहे, (थिएटर्स उघडली जाणे) तसेच जनजीवन सामान्य होत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.''

ABOUT THE AUTHOR

...view details