मुंबई- अनुराग कश्यप यांना बॉलिवूडमध्ये एका उत्तम दिग्दर्शकाची ओळख निर्माण करून देणारा गँग्स ऑफ वासेपुर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या तुफान यशानंतर चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित करण्यात आला. सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच निमित्ताने अनुराग कश्यपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
'गँग्स ऑफ वासेपुरला' ७ वर्ष पूर्ण, अनुराग म्हणतो ७ वर्षांपूर्वी माझे आयुष्य उद्धवस्त झाले - best movie
सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच निमित्ताने अनुराग कश्यपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.बरोबर सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी माझं आयुष्य उद्धवस्त झाल्याचं अनुरागनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बरोबर सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी माझं आयुष्य उद्धवस्त झाल्याचं अनुरागनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. खरंतर या चित्रपटानंतपर अनुरागचं अनेकांनी कौतुक केलं आणि हा चित्रपट त्याला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. मग असं असतानाही अनुरागनं असं का म्हटलं, हाच सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला असेल.
याच कारणही अनुरागनं पुढे सांगितलं आहे. या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या अनुरागकडून अपेक्षा वाढल्या. या चित्रपटापासून मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी असे सगळ्यांना वाटत आहे. मी या अपेक्षांपासून दूर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. ही साडेसाती २०१९ च्या शेवटी संपेल अशी आशा करतो, असे ट्विट अनुराग यांनी केली आहे.