महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाजीराव मस्तानी'ची ५ वर्षे : प्रियंका म्हणते हा एक "गौरवशाली अनुभव" - संजय लीला भन्साळी

माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिने 'बाजीराव मस्तानी'मध्ये काशीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या रिलीजला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात पहिला पेशवा बाजीराव आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची प्रेमकथा दाखवण्यात आली होती.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

By

Published : Dec 19, 2020, 3:18 PM IST

मुंबई- सुपरहिट 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाला शुक्रवारी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यामध्ये माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने काशीबाईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे स्मरण करताना तिने हा एक "गौरवशाली अनुभव" होता असे म्हटले आहे.

बाजीराव मस्तानीला पाच वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रियंकाने ट्विरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांचे तिने आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा -कार्तिक आर्यन २० दिवसात पूर्ण करणार 'धमाका'चे शुटिंग!!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी हा ऐतिहासिक चित्रपट नागनाथ एस इनामदार यांच्या 'बाजीराव मस्तानी' या मराठी कादंबरीवर आधारित आहे. यात मराठा पेशवा बाजीराव पहिला आणि त्यांची दुसरी पत्नी यांची कहाणी आहे.

हेही वाचा -सलोनी गौरच्या नव्या 'रनआऊट' व्हिडिओवर कंगना भडकली

ABOUT THE AUTHOR

...view details