महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 25, 2020, 4:42 PM IST

Updated : Jun 25, 2020, 10:01 PM IST

ETV Bharat / sitara

क्रिकेट विश्वचषक विजयाला ३७ वर्ष पूर्ण, '83' च्या टीमने दिल्या शुभेच्छा!

२५ जून १९८३ रोजी पहिल्यांदा भारताने इंग्लँडमध्ये क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. त्याला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच ऐतिहासिक विजयावर आधारित '83' हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या सिनेमाच्या टीमने '83' च्या क्रिकेट टीममधील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

37 years complete of cricket World Cup victory
'83' च्या टीमने दिल्या शुभेच्छा

मुंबई - २०२० मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये सर्वांचे लक्ष '83' या चित्रपटावर केंद्रीत झाले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे या चित्रपटाची रिलीजची तारीख ठरताना दिसत नाही. मात्र पुन्हा एकदा विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

'83' या मल्टीस्टारर चित्रपटात आजचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारत आहे. कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय खेचून आणला होता.

आजच्या या विजयी दिवसाच्या निमित्ताने रिलायन्स एन्टरटेन्मेंटने भारतीय संघाला शुभेच्छा देत असताचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मॅजिक रचले गेले. इतिहास लिहिला गेला. याच दिवशी भारतीय संघाने विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटला नेहमीसाठी बदलून टाकले.''

हेही वाचा - सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला समोर; जाणून घ्या काय आहे मृत्यूचे कारण...

या चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फँटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि '83' फिल्म लिमिटेड यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details